फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी बाजपेयी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, 'कलाकार व्हायचे असल्यास दूरचित्रवाणी, चित्रपट किंवा ओटीटी या कोणत्याही माध्यमाचा विचार करू नये. दोन ते तीन वर्ष समर्पित भावनेने काम शिकण्याला प्राधान्य दिले पाहिजे. काम शिकल्यावर अधिक काळ टिकून राहता येते. त्यामुळे शिकणे खूप महत्वाचे आहे' असा सल्लाही यावेळी बाजपेयी यांनी दिला.