'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या विधानांमुळे चर्चेत येत असतात. राज्यात वाढत चाललेल्या महागाईवर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत राज्यांमध्ये वाढत चाललेली महागाई कमी करा आणि महिलांना ज्या पद्धतीने एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिली त्याच धर्तीवर घरातील गॅस सिलेंडरचे दर देखील ५० टक्क्याने कमी करा अशी मागणी केली आहे.