BMC CAG Report: "मुंबईवर यांचा डोळा"; कॅग अहवालावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका
मुंबई महापालिकेच्या कारभारातील पारदर्शकतेवर कॅगच्या अहवालात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालातील मुद्दे सभागृहात वाचून दाखवले. मनपातील भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल, असं फडणवीस म्हणाले. यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देत अशीच अपेक्षा इतर महानगरपालिकांच्या बाबतीत देखील आहे, असं म्हटलं. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक मनपाची देखील कॅगची चौकशी व्हावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे