भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बांधकाम व्यावासायिकांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. गुन्हे शाखेतील पथकाने तातडीने तपास सुरू केला. खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या कोल्हापुरातील तरुणासह दोघांना गुन्हे शाखेने सापळा लावून पकडले.