भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा खासदार गिरीश बापट यांचं प्रदीर्घ आजाराने पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९७३ पासून ते राजकारणात सक्रिय होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील अनेक आठवणींना आज उजाळा दिला जातोय. गिरीश बापट यांच्या कसबा पोटनिवडणुकीतील अशाच एका प्रसंगाची चर्चा आज होतेय.