अकोला शहरातल्या रेल्वे स्टेशनवर काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक महिला मुंबईला जाण्यासाठी अकोला रेल्वेस्टेशनवर आली पण तेवढ्यात अमरावतीवरून मुंबईला जाणारी अंबा एक्सप्रेस ही स्टेशनवरून निघाली. तर चालती ट्रेन तिच्या मुलीने पकडली पण ही महिला ट्रेन पकडत असताना तिचा पाय घसरून तोल गेला , आणि ती रेल्वेखाली जावू लागली. तेवढ्यात स्टेशनवर व्हेंडर शंकर स्वर्गे याने त्या महिलेला ओढल्याने त्या महिलेचे प्राण वाचले. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.