Ajit Pawar: "आम्हीही यात्रा काढल्या होत्या..."; सावरकर गौरव यात्रेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Lok Satta 2023-03-30

Views 0

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेस पक्षांकडून होत असलेला अपमान बघता जनतेला सावरकर यांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी ३० मार्चपासून राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 'महापुरूषांबद्दल सर्वांना आदर आहे. महत्त्वाचे मुद्दे यावरून लक्ष वळविण्यासाठी हा यात्रेचा प्लॅन असू शकतो. मध्यंतरी काही लोकांनी शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केली तेव्हा आम्हीही यात्रा काढल्या होत्या पण वातावरण वेगळं करायचं प्रयत्न आम्ही केल्या नाही' अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS