पिंपरी- चिंचवड शहरातील आयटी अभियंता असलेल्या तरुणाने बाईकवरून अवघ्या २४ तासात तब्बल ३ हजार ४८ किलोमीटरचा प्रवास करून विक्रमाला गवसणी घातली आहे. विनिल खारगे अस या आयटी अभियंता तरुणाचं नाव आहे. त्याने पुणे ते कन्याकुमारी आणि पुन्हा पुणे असा बाईकवरून प्रवास करत विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. विक्रम नोंदवल्यानंतर विनिलला आनंदाश्रू अनावर झाले.