Vijay Shivtare: 'संजय राऊत सच्चे शिवसैनिक'; राऊतांना आलेल्या धमकीवर शिवतारेंची प्रतिक्रिया
संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी बिष्णोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटातील शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले की, 'संजय राऊत आणि मी जवळपास सात वर्ष प्रवक्ते म्हणून काम केले आहे. आम्ही दोघांनी शिवसेनेची बाजू मांडण्याच काम केल आहे. संजय राऊतांसारखा माणूस अशा धमक्याना भीक घालणारा नाही. ते सच्चा शिवसैनिक असून बिष्णोई किंवा कोणीही असू त्याचा त्यांना काही फरक पडत नाही'#bishnoi #eknathshinde #shivsena #vijayshivtare
रिपोर्टर: सागर कासार