पोलिस खात्यात ड्रायव्हर म्हणून शेवटचा दिवस; साहेबांनी स्वतः गाडी चालवत केला सन्मान | Viral Video
एका सेवानिवृत्त पोलिस ड्रायव्हरला निरोप देतानाचा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत ASI सुनील मोरे हे आज जवळपास 36 वर्षांनंतर पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचं आज गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत आगळंवेगळं स्वागत झालं. एवढंच नव्हे तर नोकरीवर असताना सुनील मोरे जी गाडी चालवित होते त्याच गाडीत त्यांना बसवून त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आज गाडी स्वतः चालवित त्यांनाच सन्मान केला