केंद्र सरकारच्या सुपर ६० विद्यार्थ्यांमध्ये बीडच्या एका विद्यार्थ्याची निवड झाली आहे. आजपासून राष्ट्रपती भवनात फेस्टिवल ऑफ इनोवेशन अँड इंटरप्रेनरशिपचे आयोजन करण्यात आले असून यासाठी बीडच्या विद्यार्थ्यासह शिक्षकाचीही निवड झाली आहे. बीडमधील कुर्ला येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या ओंकार शिंदेने कांदा चिरताना आपल्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबावे यासाठी स्मार्ट चाकूची निर्मिती केली. चला तर पाहुयात नेमका कसा आहे हा चाकू..?