"मी तुझ्यासारखा नंगा नव्हतो. भंगार विकले नाही, मी घरचा धनी होतो. तुझी समाजात किंमत काय, कुवत काय? त्यामुळे माझ्या काय चौकशा लावतो त्या लाव..." अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर तोफ डागलीय. मुक्ताईनगरमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंचे आपण लवकरच ऑडिट करू, असा इशारा दिला होता. त्यावर एकनाथ खडसे यांनी आमदार चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडलं.