"अनिल देशमुख इतके दिवस झोपले होते का? सीबीआयने त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश केल्याने त्यांना जाग आलीय. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकला होता. पण आता सीबीआय चौकशीत सत्य समोर आलंय. हा विषय कुठतरी भरकटला पाहिजे म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करतायत", अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांना लक्ष्य केलंय.