अजित पवारांनी जळगावात मोठं विधान केलंय. "माझ्या हाताला बहिणींनी बांधलेल्या राख्या आहेत, तोपर्यंत मला दुसऱ्या संरक्षणाची गरज नाही. माझ्या बहिणींचे, माय-माऊलींचे आशीर्वाद, राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल आहे कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही. त्यांच्या कल्याणासाठी काम करतांना जर माझं बरंवाईट झालं तरी मला त्याची पर्वा नाही", असं अजित पवार म्हणाले.