शिर्डी : परभणी आणि बीड या दोन्ही जिल्ह्यातील तणाव आपल्या सर्वांना मिळूनच शांत करावा लागणार आहे. बीड जिल्ह्यात समाजात दुफळी पहिला मिळतेय. तसेच परभणीतही आंदोलना सुरू असल्याच पहिला मिळतय. हे दोन्ही भाग शांत झाली पाहिजे तसेच जी दुफळी निर्माण झाली आहे. ती दूर झाली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करतय. आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी सरकार कटीबद्ध असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई दर्शनानंतर माध्यमांशी म्हंटलेय.
शिर्डीत भाजपाचे उद्या होणाऱ्या महाविजय अधिवेशनासाठी राज्यातील सर्वच भाजपाच्या कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशा बदल त्यांचे आभार मानणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीची दिशा देखील या अधिवेशनातुन देणार असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने शॉल साई मूर्ती देवून सत्कार करण्यात आलाय.