नागपूर : "भारतीय परंपरेमध्ये उदातीकर�" /> नागपूर : "भारतीय परंपरेमध्ये उदातीकर�"/>

"मांसाहारामध्ये प्रसादाचा भाव...", फडणवीसांच्या उपस्थितीत नेमकं काय म्हणाले पिठाधीश? पाहा व्हिडिओ

ETVBHARAT 2025-01-18

Views 4

नागपूर : "भारतीय परंपरेमध्ये उदातीकरण सर्व ठिकाणी दिसून येते. जर एखादं कुटुंब मांसाहार सेवन करत असेल तो त्याच्यासाठी आवडीचा विषय असू शकतो. त्यात काही चूक नाही, खाल्लं पाहिजे. पण अनियंत्रितरुपानं दररोज मांसाहार खानपान केल्यानं त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसतात. ज्या प्राण्याचे मांस भक्षण केलं जातं, त्या प्राण्यातील भाव त्या व्यक्तीच्या शरीरावर काही अंशी दिसतात", असं स्पष्ट मत कूडली श्रृंगेरी महासंस्थानचे 72 वे पिठाधीश शंकराचार्य अभिनव शंकर भारती महास्वामी यांनी व्यक्त केलंय. नागपूरमध्ये 'बनाये जीवन प्राणवान' या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. पुढं बोलत असताना पिठाधीश म्हणाले की, "आपल्या संस्कृतीमध्ये एकाद्या प्राण्याची बळी दिली जाते, त्यानंतर मांस प्रसाद रुपात भक्षण करतात. आधी मांस भोगचा पदार्थ होता, पण आता मांस हा प्रसाद झालाय. त्यात भावचा अंतर आलाय. केवळ भोग पदार्थाला सोडून त्याला प्रसाद रुपात स्वीकार केल्यानं आहार पदार्थाचे गुण बदलतात असं संशोधन सांगतात."

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS