पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असं पाऊल पंतप्रधान मोदी यांनी उचललं : मंत्री गुलाबराव पाटील

ETVBHARAT 2025-05-08

Views 2

जळगाव - राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरूवारी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी केली. याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करून मदतीचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, "देशावर आक्रमण झालं तर, प्रत्युत्तर देण्याची ताकद भारताकडं आहे. पंतप्रधान मोदींनी एअर स्ट्राईक करून देशाला अभिमान वाटेल असं पाऊल उचललं आहे. तुम्ही आमच्या देशावर आक्रमण कराल तर, भारत त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो. हे या कारवाईतून सिद्ध झालय. कालच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा झाली. मात्र, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. दुसरीकडं अवकाळी पावसामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळं प्राथमिकता ही देश आणि शेतकऱ्यांना द्यायला हवी. निवडणुका होतच राहतात.  पण आधी देश महत्त्वाचा आहे."

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS