घोडागाडी, बैलगाडीवर बसून पीएमपीएमएल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन

ETVBHARAT 2025-06-05

Views 3

पुणे : पीएमपीएमएल प्रशासनानं केलेल्या दरवाढीच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पुणे महापालिका बाहेर घोडागाडी, बैलगाडी आणि घोड्यावर बसून सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, "पीएमपीएमएलकडून नुकतीच तिकीट दरवाढ करण्यात आली. ही तिकीट दरवाढ पुणेकरांना खड्ड्यात लोटणारी आहे. ज्या पुणेकरांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरभरून मतदान केलं. त्या पुणेकरांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम सरकारनं केलं आहे. पुण्याची ओळख ही पूर्वी टांग्यांच शहर म्हणून होती. आता परत पुणेकरांना टांगा, घोडागाडी तसंच बैलगाडीतून फिरण्याची वेळ आली आहे, म्हणून आम्ही याचा निषेध अनोख्या पद्धतीनं करत आहे."

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS