सोलापूर : राज्याचे मत्स्य व्यवसाय आण�" /> सोलापूर : राज्याचे मत्स्य व्यवसाय आण�"/>
सोलापूर : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी धाराशीव येथे भाषण करताना कुणीही कितीही नाचला, उड्या मारल्या तरी, तुमचा बाप म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री फडणवीस आहेत. राणेंच्या या विधानाने राज्यात महायुतीमधील नेते नाराज आहेत. सोलापूरमधील माकपाचे माजी आमदार आणि कामगार नेते नरसय्या आडम यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "नितेश राणे हा अतिशय छोटा माणूस आहे. त्याला काहीच अनुभव नाही. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना जनतेने सत्तेतून बाहेर काढलं होतं. नितेश राणेंच्या अशा वक्तव्याकडं लक्ष देऊ नका" असं माजी आमदार आडम मास्तर म्हणाले.
प्रणिती शिंदे आणि देवेंद्र कोठेंवर केली टीका : कामगार नेते नरसय्या आडम मास्तर हे बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजी विक्रेत्यांना घेऊन आंदोलन करत होते. त्यावेळी आडम मास्तर यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांच्यावरही टीका केली आहे. हे सर्व भाजी विक्रेते सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रातील आहेत. तेथील भाजपा आमदार निवडणुकीच्या काळात 'जय श्रीराम' अशा घोषणा देत निवडून आले आहेत. तर भाजी विक्रेत्यांसाठी भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडं वेळ नाही का? असा सवाल आडम मास्तर यांनी उपस्थित केला आहे.