राज ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दा; काय म्हणाले राज ठाकरे, पाहा व्हिडिओ

ETVBHARAT 2025-07-05

Views 5

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली. आज तब्बल 20 वर्षांनंतर मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले. या मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मराठीच्या मुद्द्यावरुन भाषण करत उपस्थितांची मनं जिंकली. तर, राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाषण करुन राजकीय फटकेबाजी केली. उद्धव ठाकरेंनी राजकीय मुद्द्यांवरुन भाजपा आणि मोदी सरकारला लक्ष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवरही बोचरी टीका केली. सभेत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, "आम्ही मराठी माध्यमात शिकलो, हो शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. होय. मग यांना मराठीचा पुळका कसा? बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घेऊ शकता का? लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. कॉन्व्हेंटमध्ये शिकले. मग, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?," असा सवाल राज ठाकरेंनी केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी बरोबर आणलेल्या यादीतून दक्षिणेतल्या कलावंत आणि नेत्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची जंत्री वाचून दाखवली. 

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS