मनोज जरांगे मुंबईकडे रवाना; पत्नी सुमित्रा म्हणाल्या, ही शेवटची लढाई, सरकारने मराठा समाजाची काळजी घ्यावी

ETVBHARAT 2025-08-27

Views 8

बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते मुंबईत येऊन आझाद मैदानावर शांततेत आंदोलन करणार आहेत. आज आंतरवाली सराटीत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या मुलीचे आणि पत्नीचे डोळे पाणवले होते. त्यानंतर सुमित्रा जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "दोन वर्षापासून सरकार तारीख पे तारीख देत आहे. ही अखेरची लढाई आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईमधून मनोज जरांगे पाटील उठणार नाहीत. सरकारने माझ्या नवऱ्याची आणि मराठा समाजाची काळजी घ्यावी. सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं." तर मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जात असतानाचा आदोलनांचा व्हिडिओ पाहा 'ईटीव्ही भारत'च्या बातमीत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS