मराठा आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावरून बच्चू कडूंचा शरद पवारांना टोला, पहा काय म्हणाले?

ETVBHARAT 2025-08-31

Views 33

बुलढाणा : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणावरील वक्तव्यावरून तिखट टीका केली आहे. शरद पवार यांनी घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत केलेल्या विधानावर कडू म्हणाले, "शरद पवारांना आता जे सुचलं, ते त्यांनी यापूर्वी केलं असतं  तर महाराष्ट्र गुण्यागोविंदानं नांदला असता. जाती-धर्मात तेढ निर्माण झाला नसता. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मुजरा करत आहेत. पण देशातील आणि महाराष्ट्रातील प्रश्नांकडं त्यांचं लक्ष नाही" असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारही अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. बच्चू कडू यांनी पवार आणि सरकारच्या धोरणांवर टीका करताना सामाजिक सलोखा राखण्याची गरज अधोरेखित केली. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS