मुंबईत महायुतीचाच महापौर होणार; एकनाथ शिंदे यांना विश्वास, पुण्यात विरोधकांना कात्रजचा घाट दाखवणार

ETVBHARAT 2026-01-09

Views 3

पुणे : राज्यात महापालिकेच्या निवडणुका सुरू असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे अजित पवार यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. मुंबईतील लढत बाबत शिवसेनेचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त करत मुंबईत महायुतीचा महापौर होणार असल्याचं सांगितलं आहे. 
शिवसेनेचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पुण्यातील कात्रज परिसरात त्यांचा रोडशो आयोजित करण्यात आला होता. यानंतर पुण्यातील नानापेठ येथे एकनाथ शिंदे यांची सभा देखील आयोजित करण्यात आली होती. यानंतर त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. मुंबई येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या घोषणाबाजीबाबत एकनाथ शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की कुठल्या कार्यकर्त्यांनी काय घोषणा दिल्या हे मला माहिती नाही पण शिवसेना-भाजपा मुंबईत मोठ्या ताकदीने लढत आहे. मुंबईकर मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार आहे. मी तुम्हाला एक सांगतो की, मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS