संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी "संकष्टी चतुर्थी" असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. अशी या व्रताची पाळ्णूक आहे.