कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह पर्व सुरु होतो. या दिवशी तुळस आणि भगवान विष्णूचे लग्न लावले जाते. यंदा 26 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत तुळशी विवाह करता येईल.या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सोशल मिडियाचा वापर करु शकता. मोबाईलवरुन मेसेजेस, ग्रिटींग्सद्वारे तुम्ही एकमेकांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा देऊ शकता.