गेट वे ऑफ इंडिया ज्या जागी उभं आहे त्या अपोलो बंदराचं नाव युरोपातील अपोलो या सूर्यदेवावरून दिलंय असं अनेकांना वाटतं. पण हे नाव एका माश्याच्या देशी नावाचंच पोर्तुगीज व ब्रिटिशांनी अपभ्रंश केलेलं रूप आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या परीसरातच ताज महाल हॉटेल आहे व अनेकांना वाटतं की गेट वे ताजपेक्षा जुना आहे, पण तसं नाहीये... या परीसराचा रंजक इतिहास सांगतायत, खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...