मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. प्रशासनानेही नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या स्वत: रस्त्यावर उतरुन, मुंबईकर मास्क लावतात की नाही त्याची पाहणी करत आहेत. किशोरी पेडणेकर यांनी लोकल रेल्वेचे प्लॅटफॉर्म, भाजीमंडई ते स्टेशनबाहेरील विक्रेत्यांना मास्क लावण्यास बजावलं आहे