कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा अचानक पुढे ढकललेल्याने परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आहेत.शासनाच्या या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी कोल्हापूर शहरातील स्पर्धा परिक्षा करणारे विद्यार्थी एकवटले आहेत. शिवाजी विद्यापीठाजवळील सायबर चौकात शेकडो परीक्षार्थ्यांनी एकत्र येत रास्ता रोको करत शासनाच्या निर्णयाचा विरोध केला.कोव्हीड-१९ चा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे मिळताच परीक्षार्थी मध्ये नाराजी पसरली आहे. राज्यसेवा परिक्षा झालीच पाहिजे,परिक्षा आमच्या हक्काची अशा घोषणा देत परिक्षार्थ्यांनी मुख्य रस्त्यावर ठाण मांडले.यावेळी पोलिस प्रशासन दाखल झाले असुन विद्यार्थ्यांनी रस्ता रिकामा करावा अशी विनंती परीक्षार्थींना केली जात आहे.