कोल्हापूर - नवरात्रोत्सवातला आज महत्त्वाचा दिवस. नवमी. खंडेनवमी. या दिवशी आयुध आणि शस्त्रास्त्रपूजन केले जाते. नऊ दिवसातील आई अंबाबाईच्या नऊ मुद्रांचे दर्शन घेऊन तृप्त झालेल्या डोळ्यांना आज कोल्हापुरातील आई अंबाबाईची शांकभरी माता रुपातील पूजा बांधून आगळी अनुभूती दिली गेली.