कोल्हापुरात एका रस्त्याला आखरी रास्ता असे नाव आहे. किंबहुना एका मंडळाच्या नावाचा फलक याच नावाने आहे. मृतदेहाचा शेवटचा प्रवास या रस्त्याने होतो म्हणून आखरी रास्ता असे संबोधले जाते. काळाच्या ओघात रस्त्यावरील वर्दळ वाढली. वाहनांची संख्या वाढली. रस्त्याच्या बाजूला दाटीवाटीची वस्ती आहे. गंगावेस ते पंचगंग नदीकडे जाणारा रस्ता सुस्थितीत व्हावे यासठी आंदोलने झाली. निवेदने दिली पण प्रशासनाचे काही डोळे उघडले नाहीत. पावसाळ्याच्या तोंडावर गंगावेस ते गायकवाड बंगल्यपर्यंती स्थिती जाणून घेतली. खरे म्हणजे शब्दात सांगण्यासारखी स्थिती नाही. हा व्हिडिओच रस्त्याची अवस्था दाखवून देईल.
रिपोर्टर - युवराज पाटील
व्हिडिओ - मोहन मेस्री