अहमदनगर : मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणंलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे २४ तासात पावणे चार इंच तर घाटघरला ४ इंच पाऊस पडला. भंडारदरा जलाशयात २४ तासात २३५ दशलक्ष घनफूट आवक झाली असून लेव्हल १५३.३० तर साठा ३३१९ असून वाकी जलाशय मुसळधार पावसात भरला आहे. वाकी धरणातून ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून ९७ क्यूसेकने पाणी निळवंडे धरणात सोडण्यात आले आहे.
#sakalnews #sakalmedia #marathinews #treding #esakal