Marathwada Rain update : निम्न तेरणा धरण शंभर टक्के भरले | Nimn Terna Dam full | Sakal Media
माकणी (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद-लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला माकणी (ता.लोहारा) येथील निम्न तेरणा प्रकल्प रविवारी (ता.२६) शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे पहाटे पाच वाजता धरणाचे चार दरवाजे उघडून पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. त्यानंतरही पाण्याचा ओघ सुरुच असल्याने सकाळी आठ वाजता सर्व १४ दरवाजे उघडले. तरी पाण्याचा ओघ अधिक असल्याने यातील चार दरवाजे २० सेंटिमीटरने उघडून १९५.२० क्युसेक्सने पाण्याचा विर्सग नदी पात्रात कराण्यात येत आहे. (व्हिडिओ - सदाशिव जाधव)
#osmanabad #Makani #NimnTernadam #Marathwada #Rain