महापालिकेचा दावा खोटाच! पुण्यात आंबिल ओढ्याला पुरस्थितीचा धोका | Pune | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 307

सहकारनगर : मागील वर्षीच्या 25 सप्टेंबर रोजी आंबिल ओढयाला आलेल्या पुरात पुणे शहराच्या दक्षिण भागातील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात जीवित आणि वित्तहानी झाल्याच्याही घटना घडल्या.त्याचा सर्वाधिक फटका हा सहकारनगर येथील टांगेवाला कॉलनी,पद्मावती,मोरे वस्ती, ट्रेझर पार्क,मल्हार वसाहत, संत नगर, अण्णा भाऊ साठे वसाहत,तावरे कॉलनी,अंबिल ओढा, दांडेकर पूल इ. परिसरातील नागरिकांचे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर पुणेकरांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आखून त्याची पावसाळया आधीच अंमलबजावणी केल्याचा दावा महापालिकेने केला. मात्र प्रत्येक्षात तसे झाले नसल्याचे नागरिक आरोप करीत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा जोर वाढला तर पूरस्थिती निर्माण होती की काय या भीतीने अजून नागरिक भयभीत होत आहेत.
पूरपरिस्थिती मुळे मागील वर्षी जीवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानुसार सद्य परस्थितीत पुणे शहरातील पावसाळ्याचा विचार करता चालू वर्षी (टांगेवाला कॉलनी) सदर ठिकाणी पुन्हा जीवितहानी होण्यासाची शक्यता नाकारता येत नाही. तरी आंबिल ओढ्यालगत असणारा बाधित पूरस्थितीजन्य जागा त्वरित रिकाम्या करणे आवश्यक आहे. असे महापालिका बांधकाम विभागाने टांगेवाला कॉलनीत नोटीस लावली आहे.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS