मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय बुधवारी कोल्हापुरात झालेल्या गोलमेज परिषदेत घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवून समाजाला पूर्ववत आरक्षण मिळावे, समाजातील विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या चालू शैक्षणिक वर्षातील फीचा परतावा शासनाकडून मिळावा, केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळावा, यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा, आदी 15 ठराव परिषदेत मंजूर झाले.
बातमीदार - युवराज पाटील
व्हिडीओ - मोहन मेस्त्री