कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण व सारथी संस्थेला स्वायत्तता मिळावी यासाठी 'लाल महाल ते लाल किल्ला' असे आंदोलन छेडण्यात येणार आहे. लाल महाल येथे २९ ऑक्टोबरला आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी बैठक होणार असून, दिल्लीत मराठ्यांची ताकद दाखविण्यात येणार आहे. तसा निर्धार सकल मराठा समाजातर्फे आयोजित व्यापक मेळाव्यात करण्यात आला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित होते.
#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews