राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती! 26 जून 1874 साली जन्मलेले शाहू महाराज आजही दलित, बहुजन आणि मागासवर्गीयांसाठी आधारस्तंभ समजले जातात. ब्रिटीश राजसत्तेमध्ये सामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याकाळातही पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते असणार्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्तरावर काळाच्या पुढे जाऊन विचार केल्याने आणि त्यानुसार समजाची घडी बसवल्याने आजही जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे.1