कोल्हापूर - दिवाळी म्हटले की, रांगोळ्यां आणि लख्ख पणत्यांनी अंगण सजते. याच पार्श्वभूमीवर परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधत कलात्मक छोटे आकाश कंदील आणि लाकडातील पणत्यांची निमिर्ती तिघी मैत्रिणींनी केली आहे. अनू दीक्षित, गौरी ठाकूर, मीनल आगळगावकर अशा या तिघी मैत्रिणी. दरम्यान, तिघीही कोरोना लॉकडाउनच्या काळात घरी होत्या. याच काळात त्यांनी विविध संकल्पना पुढे आणल्या आणि त्यातून शॅडो लॅंप, पॉट हॅंगिंग स्टॅंड, डायमंड दिवे, स्क्वेअर दिवे अशा विविध कलाकृती साकारल्या.
व्हिडिओ - बी. डी. चेचर