गौरी- गणपतीचा म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा सण. यातूनच पुण्यातील कर्वेनगर भागात असणाऱ्या शीतल बराटे यांनी मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा सामाजिक संदेश देणारा सुंदर देखावा सादर केलाय. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत तसेच एका मुलीच्या आयुष्यातील सर्व क्षण या भव्य देखाव्यात साकारण्यात आले आहेत.