भुसावळ : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडत आहे. हौसे नवसे अनेक उमेदवार निवडणुकीत उभे राहून आपले नशीब आजमावत आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला असून, मागील आश्वासने पूर्ण न झाल्याने उमेदवारांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार मागण्यासाठी मतदारांच्या दारी गेलता मागील निवडणुकीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने संतप्त मतदारांनी या उमेदवारास शिव्यांची लाखोली वाहिली तसेच तालुक्याच्या आमदारांवर ही रोष व्यक्त केला याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल खूप व्हायरल होत असून सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
#Bhusawal #Grampanchayat #Viral #ViralVideo #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.