राहुल पापळ महाराष्ट्रातल्या तमाम उद्योगांना लाजवेल असा तरुण. इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर आपण आकाशाला गवसणी घालू शकतो, हे राहुल या तरुणांनी दाखवून दिले. उत्तम उद्योजक, उत्तम संयोजक, उत्तम संघटक, किल्ले भरारी, दर्जेदार सामाजिक पुस्तकांच्या माध्यमातून राहुल यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला झाली आहे. राहुल यांच्यामुळे अनेक नोकरी करणारे आपली नोकरी सोडून उद्योगाकडे वळले. महाराष्ट्रातल्या चाळीस हजार युवकांना रोजगाराच्या माध्यमातून राहुल यांनी त्यांच्या हाताला काम दिलं. ही संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उद्योगाची कास धरली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योगाच्या मार्केटमध्ये आपली ताकद पणाला लावली पाहिजे. या विचारातून राहुल यांनी उभं केलेलं काम नव्या स्वरुपाचं रुप धारण करत आहेत. राहुल यांचा सगळा प्रवास, त्यांनी सुरू केलेले काम, त्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कष्टकऱ्यांच्या घामाचे झालेले चिज, अशा अनेक विषयांना घेऊन राहुल यांना ‘सक्सेस पासवर्ड’ या शोच्या माध्यमातून बोलतं केलेय सकाळचे संदीप काळे संपादक यांनी. चला तर मग सहभागी होऊ या संदीप काळे यांच्या सोबत ‘सक्सेस पासवर्ड’ या खास कार्यक्रमात.
⏩ नक्की बघा 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'