शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर ईडीचा छापा
गैरव्यवहार प्रकरणातील कागदपत्रांची तपासणी सुरू
पुणे, ता. 15 : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी बॅंकेच्या मुख्यालयावर छापा टाकला आहे. ईडीच्या अधिका-यांकडून या गुन्ह्यातील कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक शुक्रवारी सकाळीच शहरात दाखल झाले होते.
बॅंकेतील 71 कोटी 78 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी संचालक आमदार अनिल भोसले यांच्यासह 16 पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी आमदार भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ, मुख्य लेखापाल शैलेश संपतराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव यांना पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. भोसले यांच्या लॅंड क्रूझर, टोयाटो कॅमरे अशा दोन आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच त्यांच्या 32 कोटी रुपयांच्या मालमत्ता अधिगृहीत करण्याचा प्रस्तावही सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी योगेश लकडे (वय 39, रा. आंबेगाव नऱ्हे) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.