मुक्ता भोसले ‘मन मुक्तांगण’च्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला परिचित झाल्या. मुक्ता भोसले यांचा जीवन प्रवास आज ‘सक्सेस पासवर्ड’ या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. समुपदेशन, महिला सबलीकरण, मॅरेथॉन स्पर्धा, मजाच मजा अशा अनेक संकल्पनाशी ज्या मुक्ता भोसले यांचं नाव जोडलेलं आहे, त्यांचा गावापासून ते मुंबईपर्यंत हा प्रवासही थक्क करणारा आहे. ज्या मुलीला कधीकाळी बोलता येत नव्हतं, ती महिला होऊन आज हजारो स्त्रियांचे नेतृत्व करते, ही त्या लाजऱ्या बुजऱ्या असणाऱ्या प्रत्येक मुली आणि महिलांसाठी उत्तम केस स्टडी, शिकवण आहे. आपल्यातील वेगळेपण प्रत्येक स्त्रीमध्ये असतं, मुलींमध्ये असतं. ते त्यांनी वेळीच ओळखून कुठल्यातरी क्षेत्राला आपलं क्षेत्र बनवत आपला वेगळा ठसा उमटवावा. हेच सूत्र या मुलाखतीमध्ये त्या प्रत्येक मुलीला, स्त्रीला मुक्ता भोसले यांनी सांगितले आहे. आपल्या मनाला काय आवडतं आणि त्याचं वेगळेपण आपल्या करिअरमध्ये कसे करायचं याचे आणि उदाहरण मुक्ता भोसले यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून दिले आहेत. गावातली मुलगी मुंबईला येऊन वेगळा इतिहास रचू शकते याचे उत्तम उदाहरण असलेल्या मुक्ता भोसले यांची सकाळचे संपादक संदीप काळे यांनी घेतलेली ही मुलाखत नक्की पहा. चला तर मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.
⏩ नक्की बघा 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'