पुणे बंगळूर महामार्गावरील रस्त्यांबाबत खासदार श्रीनिवास पाटील आक्रमक| shrinivas patil |Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 818

दिल्ली - लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग संदर्भातील विषय खासदार श्रीनिवास पाटील यांनी मांडले. यामध्ये पारगाव येथील अपघाताच्या घटना लक्षात घेता तेथे नवीन पुलाचे काम हाती घ्यावे अशी मागणी केली. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर तीन पदरी पुल आहे. तेथे अपघातांच्या घटना वाढत आहेत.याठिकाणी सहा पदरी पुल बांधण्यात यावा असे सुचविले. पुणे ते शेंद्रेपर्यंतच्या महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. हा रस्ता दुरुस्ती करण्याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच खंबाटकी येथील बोगद्यांचे काम लवकर पुर्ण व्हावे अशी मागणीही यावेळी श्री. पाटील यांनी केली.
याला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीजी (Nitin Gadkari) यांनी पुणे-सातारा महामार्गावरील बहुतेक अडचणी सोडवल्या गेल्या असून उर्वरीत काम देखील लवकर पुर्ण होईल असे सांगितले. कराड येथील पुलाच्या परिसरात अपघाताचे क्षेत्र असेल तर तातडीने अर्ज द्या असे सुचविले.‌अपघातातील जिवितहानी टाळण्यासाठी अशी अपघातप्रवण क्षेत्रे काढून टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले. ( व्हिडिओ सौजन्य - लोकसभा टीव्ही)
#shrinivaspatil #Nitingadkari #Maharashtra #Newdelhi
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS