राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील कलगीतुरा सुरूच आहे. हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची धमकी दिली होती. मुश्रीफ यांच्या धमकीला पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा," असं आव्हान पाटील यांनी दिलं आहे.