भाजपाने चिंचवड पोटनिवडणूक जिंकण्यासाठी जीवाचे रान केले होते. महाविकास आघाडी आणि भाजपासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची होती. अखेर यात भाजपाने बाजी मारली आणि अश्विनी लक्ष्मण जगताप या विजयी झाल्या. चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगतापांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ते पिंपळे गुरव येथील निवासस्थानी आले होते.
#bjp #ashwinilaxmanjagtap #chandrakantpatil #pune #election #chinchwadbypollelection #maharashtra #maharashtrapolitics