जलसंपदा विभागाच्या कामांची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यावरून जयंत पाटील यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना धारेवर धरले. असेच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असे उद्विग्न उद्गारही त्यांनी काढले. दरम्यान यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा असून शिवेसना खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे.