मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी जालन्यातील बदनापूरमध्ये आज तहसील कार्यालयाला घेराव घालण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणखी आक्रमक झाल्याने हे घेराव आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणावरील स्थगिती तातडीने उठवून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी केली. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय.दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी उद्या एका बैठकीचं आयोजनही करण्यात आलं. या आंदोलनाच्या दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक बनले. जालना - औरंगाबाद रस्त्यावर गाड्यांचे टायर जाळण्यात आले
#MarathaMorcha #Marathwada #Jalana #MarathaReservation