सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केली. भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग प्रशासनाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्रुटी दूर करण्यास सांगितले आहे. पंचनामे लवकरात लवकरात संपवावे, अशा सूचना दिल्या आहेत. २० ते २५ टक्के क्षेत्र बाधित झाले आहे असा अंदाज आहे. पंचनामे लवकर करुन नुकसान भरपाई दिली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. मला फेक पंचनामे नकोत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.