पंढरपूर,ता.२६: कोरोनावर लवकरात लवकर लस उपलब्ध होऊन जगावर असलेले महाभयंकर रोगाचे संकट दूर होऊ दे, असे साकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी विठुरायाला घातले.
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढऱपूरमधील श्रीविठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाली. यावेळी त्यांच्या समवेत पार्थ आणि जय हेही होते. पुजेला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे सपत्निक उपस्थित होते. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
व्हिडीओ:शंकर टेमघरे, विलास काटे