राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज जळगावात दाखल झाले. त्यांच्या मुक्ताई निवासस्थानी तळोदा येथील माजी आमदार उदेसिंग पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांसोबत खडसेंच्या भेटीला गेले होते. नंदुरबार जिल्ह्यातील काही घडमोडींवर यावेळी चर्चा झाली. मोजके कार्यकर्ते देखील बैठकीला उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.